पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा ४८ वर

दिल्ली हिंसाचार

दिल्ली हिंसाचारा दरम्यान जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचारा दरम्यान १८ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. आकिब असे या तरुणाचे नाव असून त्याला २४ फेब्रुवारी रोजी गंभीर जखमी अवस्थेत जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

 

भाजपने ८ आमदारांना बळजबरीने हॉटेलवर ठेवले, काँग्रेसचा आरोप

आकिबच्या नातेवाईकाने सांगितले की, 'भजनपुरा येथे झालेल्या हिंसाचारा दरम्यान आकिबच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये रक्त साकळले असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र उपाचार दरम्यान आकिबचा मृत्यू झाला.' 

बंगालमध्ये राहणारे सर्व बांगलादेशी भारतीय नागरिक: ममता बॅनर्जी

दिल्ली हिंसाचारा दरम्यान, जीटीबी रुग्णालयात मृत्यू झालेल्यांचा आकडा ३९ झाला आहे. हिंसाचारात मृत्यू झालेल्या ५ जणांचे मृतदेह राम मनोहर लोहिया रुग्णालयात आणण्यात आले होते. लोकनायक रुग्णालयात ३ जणांचा आणि जगप्रवेश रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिल्ली सरकारने हिंसाचारामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमी झालेल्यांना २ लाख रुपये, किरकोळ जखमी झालेल्यांना २० हजारांची मदत जाहीर केली आहे. 

दिल्ली: कोरोनाच्या २४ संशयित रुग्णांना ITBP कॅम्पवर हलवले