ईशान्य दिल्लीत भडकलेल्या हिंसाचारात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका कॉन्स्टेबलचाही समावेश होता. आता आणखी एक नवी आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. चांदबाग येथे झालेल्या दगडफेकीत आयबीच्या एका २६ वर्षीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
दहशतवादी घाबरलेत म्हणूनच बालाकोटनंतर मोठा हल्ला नाही - माजी हवाई दल प्रमुख
'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, चांदबाग येथील नाल्यात अंकित शर्मा नावाच्या व्यक्तीचा एक मृतदेह मिळाला आहे. हत्येनंतर त्यांचा मृतदेह नाल्यात फेकण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच अंकित हे आयबीत रुजू झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून ते गायब होते. आज त्यांचा मृतदेह मिळाला.
Delhi: Body of Intelligence Bureau Officer Ankit Sharma found in North East district's Chand Bagh area today. pic.twitter.com/WLDG0odk6P
— ANI (@ANI) February 26, 2020
दरम्यान, सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर ईशान्य दिल्लीत तणावाचे वातावरण आहे. मोठ्याप्रमाणात सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. त्याचबरोबर हिंसा करणाऱ्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे परिस्थिती आता निंयत्रणात आली आहे.
मध्यरात्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाला घेराव, विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा
रविवारपासून हिंसाचाराला सुरुवात झाली होती. मंगळवारपर्यंत ईशान्य दिल्लीत तणावाचे वातावरण होते. आतापर्यंत या हिंसाचारात २० जणांचा मृत्यू झाला आहे. यावरुन सत्ताधारी मोदी सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.