पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हत्येचा गुन्हा दाखल होताच 'आप'कडून हुसेन यांच्याविरोधात कारवाई

आपच्या नगरसेवकाच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल

दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी आपचे नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या गुप्तचर विभागाचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर दयालपूर पोलिसांनी ताहिर हुसैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच  आपने ताहिर हुसेन यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.  

'आप'चा सदस्य दोषी आढळल्यास त्याला दुप्पट शिक्षा करा:

दिल्लीतील हिंसाचारामध्ये ताहीर हुसैन यांचे नाव आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा दिल्लीतील खजूरी परिसरातील कारखान्याला ताळे लावले होते. गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्याच्या हत्येसह त्यांच्यावर हिंसाचार पसरवल्याचा आरोप आहे. या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी ताहिर हुसेन यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या उपस्थितीच सोमवारी मी घराबाहेर पडलो होतो, असे स्पष्टीकरण देत त्यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.

भीमा-कोरेगाव: ३४८ गुन्हे मागे, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना माफी नाही!

प्रसारमाध्यमांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना देखील यासंदर्भात विचारणा केली होती. जर आपशी संलग्नित कोणी या हिंसाचारात दोषी आढळला तर त्याला दुप्पट शिक्षा द्या, असे त्यांनी म्हटले होते. दिल्लीच्या ईशान्य भागात सलग तीन दिवस उसळलेल्या दंगलीत ३८ जणांनी जीव गमावला आहे. अनेकजण यात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.