पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचार : पश्चिमी उत्तर प्रदेशातून आणल्या गेल्या गावठी पिस्तूल

दिल्ली हिंसाचार

दिल्लीच्या ईशान्य भागात गेल्या सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या नागरिकांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदुकीच्या गोळ्या, ब्लेड्स, दगडं, टोकदार वस्तू, खिळे यांच्या लागण्यामुळे या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या २७ जणांपैकी १४ जणांचा मृत्यू हा बंदुकीच्या गोळ्या लागल्यामुळे झाला आहे, अशी माहिती जीटीबी रुग्णालय आणि जग प्रवेशचंद्र रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. 

प्रशांत किशोर यांच्याविरोधात कल्पना चोरल्याचा आरोप, फसवणुकीचा गुन्हा

हिंसाचार घडविणाऱ्यांकडे बंदुकी, तलवारी, बेसबॉल बॅट, काठ्या आणि दगडे होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारावेळी ज्या गावठी पिस्तूल वापरण्यात आल्या. त्या सर्व पश्चिमी उत्तर प्रदेशातून आणल्या होत्या. हिंसाचारात तोंडावर फडके बांधून आलेल्या काही तरुणांशी 'हिंदुस्थान टाइम्स'च्या प्रतिनिधीने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपण उत्तर प्रदेशातून आलो असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशमधील शामली आणि मुझफ्फरनगरमधून अनेक तरूण हिंसाचार घडविण्यासाठी दिल्लीत आले होते. 

मराठी भाषा दिन विशेष : अभिमन्यू आणि रिप व्हॅन व्हिंकल...

या संदर्भात जाफराबादमध्ये नियुक्तीवर असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, उत्तर प्रदेशातून दिल्लीकडे येणाऱ्या काही सीमा रविवारीच पोलिसांनी सीलबंद करायला हव्या होत्या. सोमवारी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी या सीमा सीलबंद करण्यात आल्या. जर सीमा आधीच बंद केल्या असत्या. उत्तर प्रदेशकडून येणारे रस्ते बंद केले असते तर परिस्थिती इतकी चिघळली नसती, असे या अधिकाऱ्याने सांगितले.