पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचार: मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत जाहीर

अरविंद केजरीवाल

दिल्ली हिंसाचारा दरम्यान मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाखांच्या मदतीची घोषणा केली. अरविंद केजरीवाल यांनी  सांगितले की, 'मृतकांच्या कुटुंबियांना १० लाख, अल्पवयीनचा मृत्यू झाला असेल तर ५ लाख आणि एखाद्याचे घर, दुकान जळून खाक झाले असल्यास त्यांना ५ लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

भीमा-कोरेगाव: ३४८ गुन्हे मागे, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना माफी नाही!

अरविंद केजरीवाल यांनी पुढे असे सांगितले की, मृतांच्या कुटुंबियांना १ लाख रुपये लगेच दिली जाणार आहे आणि उर्वरित ९ लाख रुपये तपासानंतर दिले जातील. गंभीर जखमी झालेल्यांना २ लाख रुपये, किरकोळ जखमी झालेल्यांना २० हजारांची मदत करण्यात येणार आहे. तर, 'रिक्षा जळाल्यास किंवा खराब झाल्यास २५ हजार, घराचे नुकसान झाले असेल तर अडीच लाखांची मदत दिली जाणार आहे.', असे केजरीवालांनी सांगितले. 

'चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांवर FIR दाखल करण्याची ही वेळ नाही'

अरविंद केजरीवाल यांनी पुढे असे सांगितले की, 'दिल्ली हिंसाचारा दरम्यान जखमी झालेल्यांचा खासगी रुग्णालयाचा खर्च दिल्ली सरकार करणार आहे. हा खर्च दिल्ली सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या 'फरिश्ते' योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे.' दरम्यान, दिल्ली हिंसाचारामध्ये आतापर्यंत ३४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहे. जखमींवर दिल्लीतील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

आप नगरसेवकावरील आरोपावर केजरीवालांचे मौन धोकादायक: गौतम

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:delhi violence cm kejariwal says compensation of rs 10 lakhs each to families of those who have died