पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचार प्रकरण हायकोर्टात, उद्या होणार सुनावणी

दिल्ली हिंसाचार

दिल्लीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. या आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहे. मृत आणि जखमींमध्ये पोलिसांचा देखील समावेश आहे. दिल्लीच्या जाफराबाद आणि मौजपूर भागामध्ये हे आंदोलन सुरु आहे. या हिंसाचाराप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

कोरोना विषाणूः अखेर चीनची परवानगी, भारत वुहानला विमान पाठवणार

मंगळवारी एका स्वयंसेवी संस्थेने (एनजीओ) दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्यांविरुद्ध एफआयआर दाखल करत त्यांना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करावी तसंच हिंसाचारा दरम्यान मृत्यू आणि जखमी झालेल्यांना मदत करण्यात यावी अशी मागणी सुध्दा करण्यात आली आहे. बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे. 

मोदी-ट्रम्प बैठकः भारताबरोबर ३ अब्ज डॉलरचा संरक्षण करार, पाकलाही सुनावले

'ह्यूमन राइट्स लीगल नेटवर्क' (एचआरएलएन) या एनजीओने दाखल केलेल्या याचिकेमध्ये या हिंसाचार प्रकरणाचा तपास सेवानिवृत्त न्यायाधिशामार्फत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागांमध्ये लोकांवर सांप्रदायिक हल्ले वाढत आहेत, अशा ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सैन्य तैनात करण्यासाठी केंद्राला सूचना करण्याची विनंती याचिकेत केली आहे. सोमवारी आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचारात दिल्ली पोलिस दलाचे हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांच्यासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. 

आधी गुलाबाची फुले मग हिंसेत बदलत गेलं दिल्लीतलं आंदोलन