पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचार प्रकरणी जामियाच्या विद्यार्थ्याला अटक

दिल्ली पोलिसानी जामियाच्या विद्यार्थ्याला केली अटक

दिल्लीच्या ईशान्य भागात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याला अटक केली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामिया विद्यापीठात पीएचडीचे शिक्षण घेणारा आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) विद्यार्थी संघटनेचा दिल्ली प्रदेशाध्यक्ष मीरान हैदर ( ३५ वर्ष) याला अटक करण्यात आली आहे.

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भागांत एँटिबॉडी टेस्ट घ्या, ICMR चे निर्देश

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी १० वाजता मीरान हैदरला पोलिसांनी चौकशीसाठी लौधी कॉलीन येथील कार्यालयात बोलावले होते. या चौकशीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली.' मीरान हैदरच्या अटकेनंतर जामिया विद्यापीठातील शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांनी पोलिसाच्या कारवाईचा निषेध करत त्याची सुटका करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

कोरोनामुळे या सात शहरांतील घरांच्या किंमती होणार कमी

तर दुसरीकडे, आरजेडीचे राज्यसभा सदस्य मनोज झा यांनी ट्विट करत सांगितले की, 'दिल्ली पोलिसांनी मीरान हैदरला चौकशीसाठी बोलावले. मात्र वरुन आदेश आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मीरान हैदर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मदत करत होता.' तसंच, मीरान हैदरला सोडण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, जवाहरलाल नेहरु विद्यापीठात राजदच्या विद्यार्थी संघटनेने पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत हैदरला सोडण्याची मागणी केली. 

लॉकडाऊन कसा संपवायचा, पंतप्रधानांनी मागविल्या शिफारशी