पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोनिया गांधींच्या वक्तव्याचा जावडेकरांकडून समाचार

प्रकाश जावडेकर आणि सोनिया गांधी (Photo by Mohd Zakir and Vipin Kumar)

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारवर तोफ डागणाऱ्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना भाजपने प्रत्त्युत्तर दिले आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोनिया गांधींच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. दिल्लीत निर्माण झालेल्या सध्य परिस्थितीमध्ये राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्रित येत शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र काँग्रेस या मुद्यावरुन खालच्या स्तरावरील राजकारण करत आहे, असे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. दिल्ली हिंसाचारासंदर्भात सोनिया गांधी यांनी केलेले वक्तव्य निंदणीय आणि दुर्भाग्यपूर्ण असल्याचे जावडेकर म्हणाले आहे.  

दिल्ली हिंसाः दगडफेकीत ठार झालेल्या गुप्तचर अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला

दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार राजधानीमध्ये शांती आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यात अपयशी ठरल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधला. दिल्लीतील हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली. 

शांतता आणि बंधुभाव राखा, नरेंद्र मोदींचे दिल्लीकरांना आवाहन

दिल्ली पोलिस हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्यावर याठिकाणी निमलष्करी दलाचा वापर का झाला नाही? दिल्लीचे मुख्यमंत्री काय करत आहेत? दिल्लीतील आंदोनल पेटत होते त्यावेळी भाजप नेते काय करत होते? असे अनेक प्रश्न उपस्थितीत करत सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारवर तोफ डागली होती. सोनिया गांधी यांनी केलेल्या आरोपांचा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Delhi violence BJP reversed on Sonia s statement prakash Javadekar said this is dirty politics