दिल्ली हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १६०० जणांना अटक किंवा ताब्यात घेतले आहे. तर ५३१ गुन्हे दाखल करण्यात आले, असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. दिल्ली हिंसाचारामध्ये आतापर्यंत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी जीटीबी रुग्णालयात उपचारा दरम्यान एका १८ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. दिल्ली हिंसाचारा दरम्यान तो गंभीर जखमी झाला होता.
Delhi violence: 531 cases registered, over 1,600 arrested or detained, say police
— ANI Digital (@ani_digital) March 4, 2020
Read @ANI Story | https://t.co/tZwVV6F7cB pic.twitter.com/UHlbSh2oJc
जयसिद्धेश्वर महास्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
ईशान्य दिल्लीतील जाफराबाद, गोकलपुरी, मोजपूर, भजनपुरा, करावल नगर या भागांमध्ये २३ फेब्रुवारी रोजी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थक आणि विरोधक आमने-सामने आले. त्यानंतर झालेला हिंसाचार तीन दिवस सुरु होता. या हिंसाचारात आतापर्यंत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दिल्ली पोलिस दलातील पोलिस कॉन्स्टेबल रतनलाल आणि गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यांचा देखील समावेश आहे.
जोगेश्वरीतील गोदामाला लागलेली आग आटोक्यात; कुलिंग ऑपरेशन सुरु
दिल्ली हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या शाखरुखला उत्तर प्रदेश येथून अटक केली. तर गुप्तचर अधिकारी अंकित शर्मांच्या हत्येचा आरोपी आपचे माजी नगरसेवक ताहिर हुसेन अद्याप फरार आहेत. पोलिस ताहिर हुसेन यांचा शोध घेत आहे. ताहिर हुसेन आणि त्यांच्या समर्थकांनी अंकित शर्मांची हत्या करुन त्यांचा मृतदेह नाल्यात फेकला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कोरोना: पुण्याच्या रुग्णालयातील भार कमी होणार, मुंबईतही यंत्रणा