पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचार: पीएफआयच्या अध्यक्ष आणि सचिवासह १२ जणांना अटक

दिल्ली पोलिस

दिल्ली हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पीएफआय) अध्यक्ष आणि सचिव यांच्यासह १२ जणांना अटक केली. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष परवेज आणि सचिन इलियास यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांविरोधात ईडीने सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली हिंसाचारासाठी या दोघांना बाहेरुन पैसे देण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. 

कोरानाबाधितांचा आकडा थांबता थांबेना, राज्यात १४ जणांना लागण

याआधी दिल्ली पोलिसांनी सीएए आणि एनआरसीविरोधात पोस्टर वाटणाऱ्या आणि लोकांना भडकावल्याच्या आरोपावरुन पीएफआयशी संबंधित एका व्यक्तिला अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेला आरोपी दानिश पीएफआयच्या विंग काउंटर इंटेलिजेंस शाखेचा प्रमुख असून जामियातील सीएएविरोधात झालेल्या आंदोलनात तो सहभागी झाला होता. 

काँग्रेसकडून युवा नेते राजीव सातव यांना राज्यसभेची उमेदवारी

दिल्ली हिंसाचारा दरम्यान गुप्तचर विभागाचा अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाने आरोपी सलमान उर्फ नन्हे याला अटक केली. पोलिस कॉन्स्टेबल रतनलाल यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने ७ जणांना अटक केली आहे. रतनलाल यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला होता. तर जमावाने केलेल्या हल्यात अकबरी देवी यांची हत्या झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. 

'काँग्रेसमध्ये जे माझ्या आजीसोबत घडले तेच माझ्यासोबतही झाले'