पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीही पेटले

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये जोळपोळ

नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील ईशान्य भारतातील आंदोलन आता दिल्लीपर्यंत येऊन ठेपले आहे. दिल्लीतील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाने आज जाळपोळीपर्यंत पोहचले आहे. 

 

जे पाकिस्तान करत आले तेच आता काँग्रेस करतय : PM मोदी

जामियाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनकर्त्यांनी तीन बस पेटवून दिल्याची घटना घडली. आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या अग्नीशमन दलाच्या वाहनावरही आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे. एएनआयच्या वृत्तानुसार यात अग्नीशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत.   

स्थगिती सरकारमुळे महाराष्ट्र ठप्प, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

तीन बस जळून खाक झाल्या असून सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला. या घटनेनंतर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Delhi Transport Corporation buses set ablaze by protesters near Bharat Nagar over Citizenship Amendment Act