पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली : सीएएविरोधातील आंदोलनात दगडफेक

सीएएविरोधातील आंदोलनात दगडफेक (Photo by Sonu Mehta)

दिल्लीतील शाहिन बागनंतर आता जाफराबादमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. शनिवारी रात्रीपासून जाफराबाद तसेच मौजपूर परिसरातील आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लीम महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. महिला हातात तिरंगा घेऊन घोषणाबाजी करत आहेत.

ट्रम्प यांच्या दौऱ्यात भारत-अमेरिका यांच्यात हा मोठा 'सौदा' अपेक्षित

दरम्यान मैजपूर येथे दोन गटात दगडफेक झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या प्रकारानंतर पोलिसांना जमावावर अश्रूधूराचा मारा करावा लागला. सुरक्षिततेच्या कारणास्तवर मौजपूरा-बाबरपूर मेट्रो स्टेशन देखील बंद करण्यात आले आहे. महिला आंदोलकांनी जाफराबाद मेट्रो स्टेशनपासून सीलापूर, मौजपूर आणि यमूना विहार परिसराला जोडणारा रस्ता बंद केला आहे.  

परिणामी याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शनिवारी रात्रीपासून सुरु असलेले आंदोलन रविवारी देखील कायम राहिल्यानंतर मेट्रो प्रशासनाने या परिसरातील मेट्रो स्टेशनच्या आता जाणारा आणि बाहेर येणारा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.