पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: बंदूक घेऊन शाहीन बागेत आलेल्या व्यक्तीला आंदोलकांकडून चोप

शाहीन बाग

दिल्लीतील शाहीन बागेमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहेत. या आंदोलनातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती बंदूक घेऊन आंदोलनात आला होता. आंदोलनाला बसलेल्या नागरिकांनी या व्यक्तिला पकडले त्याच्या हातातील बंदूक काढून घेत त्याला चांगला चोप दिला आहे.

चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करणार

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शाहीन बागमध्ये सुरु असलेल्या आंदोलनात बंदूक घेऊन आलेल्या व्यक्तिला आंदोलनकर्त्यांनी  पकडले आणि त्याला मारहाण करत तिथून हाकलून दिले. तर, पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात त्यांना कोणतिही अधिकृत माहिती मिळाली नाही. तसंच बंदूक घेऊन आलेल्या ज्या व्यक्तिला मारहाण करण्यात आली आहे त्याच्याशी देखील संपर्क झालेला नाही. 

'PM मोदींशी चर्चा करायला तयार, CAAला आधी मागे घ्या'

शाहीन बागेमध्ये गेल्या ४० दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. याठिकाणी रस्त्यावर बसून आंदोलन सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सीएए मागे घ्यावा अशी मागणी या आंदोलनकांनी केली आहे. या आंदोलनात महिला आणि मुलं देखिल सहभागी झाले आहेत. या आंदोलनात विरोधी पक्षाचे नेते देखील सहभागी झाले आहेत. जोपर्यंत सीएए मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. 

'९ फेब्रुवारीचा मोर्चा CAA आणि NRCच्या समर्थनार्थ नाही'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:delhi shaheen bagh protest against caa a person who had gone to pistol at the protest site