पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली प्रदूषण : पुन्हा दोन दिवस शाळा बंद राहणार

१५ दिवसांत दिल्ली शहराने तिसऱ्यांदा प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

दिल्लीतील प्रदूषणाने उच्चत्तम पातळी गाठल्यामुळे पुन्हा एकदा दोन दिवस शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. सिसोदियांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, उत्तर भारतातील वाढत्या प्रदूषणामुळे परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली असून सरकारी तसेच खासगी शाळांना सुट्टी देण्य़ाचा निर्णय घेतला आहे.   

सेना आघाडीसोबत जाऊ नये यासाठी भाजप प्रयत्नशील : पृथ्वीराज

दिल्ली सरकारने १४ आणि १५ तारखेला सुट्टी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. उल्लेखनिय आहे की नोएडा येथील शाळांना यापूर्वीच सुट्टी जाहीर करण्यात आली होती. प्रदूषण आणि वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली सरकारने तयार केलेल्या 'सम-विषम'  प्रयोग आणखी काही दिवस वाढवण्याचे संकेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.

आमच्यात मुख्यमंत्री कोण हे ठरलं होतं, अमित शहांनी सोडले मौन

४ नोव्हेंबरपासून हे सूत्र शहरात लागू करण्यात आले आहे. १५ तारखेला हा नियम समाप्त होणार आहे. आवश्यकता वाटल्यास याची मुदत आणखी वाढवला जाईल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.  गेल्या १५ दिवसांत तिसऱ्यांदा दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. १५ तारखेपर्यंत शहरातील प्रदूषण आवाक्यात येईल, असा अंदाज आहे.