पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचारः कॉन्स्टेबलवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुखला अटक

दिल्ली हिंसाचारः कॉन्स्टेबलवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुखला अटक

दिल्ली हिंसाचारात पोलिसांवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुखला अटक करण्यात आली आहे. हिंसाचारावेळी शाहरुख हातात पिस्तुल घेऊन गोळीबार करत असलेले छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शाहरुखला उत्तर प्रदेशच्या शामली पोलिसांनी अटक केली आहे. शाहरुखने केवळ पोलिसांवर पिस्तुल रोखले नव्हते तर त्याने ८ वेळा गोळ्यांच्या फैरी झाडल्या होत्या. अटक होण्याच्या भीतीने तो फरार झाला होता. दुसरीकडे आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येचा आरोपी आपचा नगरसेवक ताहिर हुसेन अजूनही फरार आहे. 

दिल्लीतील जाफराबादमधील हिंसेचा चेहरा राहिलेला मोहम्मद शाहरुखला पोलिसांनी अटक केली आहे. शाहरुखने दंगलीदरम्यान हेड कॉन्सटेबल दीपक दाहियावर पिस्तुल रोखले होते. दीपक दाहियांवर पिस्तुल रोखल्याचा आणि गोळीबार केल्याचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो आपल्या कुटुंबीयांसह फरार झाला होता. 

देव सर्वांचा आहे, देव दर्शनात राजकारण नको: मुख्यमंत्री

शाहरुखच्या अटकेबाबत दिल्ली पोलिस पत्रकार परिषदेत माहिती देणार आहेत. शाहरुखला शामलीवरुन दिल्लीला आणले जात आहे. शाहरुख दिल्लीतील उस्मानपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. शाहरुखबरोबर त्याचे कुटुंबीयही फरार झाले होते. 

देवेंद्र फडणवीस यांना झटका, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

दरम्यान, ताहिर हुसेनच्या शोधासाठी पोलिस विविध ठिकाणी छापेमारी करत आहेत. पोलिसांनी शनिवारी ताहिरचे मूळ गाव अमरोहा येथे छापा मारला होता. पण तिथेही तो सापडला नव्हता.