पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

UnnaoRape Case: दिल्लीतील कँडल मार्चवर पोलिसांकडून पाण्याचा मारा

उन्नाव बलात्कार पीडितेच्या न्यायासाठी दिल्लीत कँडल मार्च  ( Photo by Sonu Mehta/ Hindustan Times)

उत्तर प्रदेशमधील उन्नावमधील बलात्कार पीडितेने दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तिच्यावरील अत्याचाराविरोधात मोठ्या संख्येने जनसमूह दिल्लीतील रस्त्यावर उतरला आहे. दिल्लीतील राजघाट ते इंडिया गेट दरम्यान कँडल मार्च काढून पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे. पीडितेला न्याय मिळवून देणाऱ्या आंदोलनकर्त्यांची आणि पोलिसांच्यात धक्काबुक्काचा प्रकार झाल्याचे वृत्त आहे.  ( Photo by Sonu Mehta/ Hindustan Times)

आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॅरेकेट्स लगावले होते. हा अडथळा दूर करुन पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी केला. यात महिलांसह पुरुष देखील सहभागी होते. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पाणी फवारणी केल्याचा प्रकार पाहायला मिळाला.  ( Photo by Sonu Mehta/ Hindustan Times)

उन्नाव जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील पीडितेवर  बलात्कार करणाऱ्या नराधमांनी तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. यात ती ९० टक्के भाजली होती. गंभीर असल्यामुळे तिला लखनऊहून एअरलिफ्ट करुन दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी अथक प्रयत्न करुन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण यात त्यांना यश आले नाही. तिची प्राणज्योत मावळल्यानंतर देशात संतापाचे वातवरण निर्माण झाले आहे. ( Photo by Sonu Mehta/ Hindustan Times) 
पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. आमच्या मुलींना न्याय द्या. आम्ही पीडितेसोबत आहोत, अशा आशयाचे फलक घेऊन अनेक तरुणी या कँडलमार्चमध्ये सहभागी झाल्या होत्या. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Delhi police using water canon to supporter of Delhi peaceful candle light march demanding justice for the rape and murder of Unnao rape victim