राजधानी दिल्लीमधून दहशतवादी संघटना आयसीसच्या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली आहे. पोलिसांकडून या संशयित दहशतवाद्यांची चौकशी सुरु आहे. या दहशतवाद्यांनी दिल्लीमध्ये कसा प्रवेश केला याचा तपास सुरु आहे.
Delhi Police Special Cell busts ISIS terror module in Delhi, 3 terror suspects arrested pic.twitter.com/p1w8oLxrap
— ANI (@ANI) January 9, 2020
भाजप-मनसे यांच्यातील युतीसंदर्भात फडणवीस म्हणाले की...
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुरुवारी वजीराबाद येथून तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. या दहशतवाद्यांकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूसं जप्त केली आहेत. हे तिन्ही संशयित दहशतवादी आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
छपाकच्या श्रेयनामावलीत अपर्णा भट्ट यांना योग्य स्थान द्या - कोर्ट