पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१२ जणांनी केली IB अधिकारी अंकित शर्माची हत्या; आरोपीने दिली कबुली

गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा

गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी सलमान उर्फ नन्हे याने चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासा केला आहे. दिल्ली हिंसाचारावेळी अंकित शर्मा यांच्यावर १२ जणांनी हल्ला करत हत्या केली होती असे त्याने सांगितले. तर याआधी शवविच्छेदन अहवालात सुद्धा अंकित शर्मा यांच्या शरीरावर चाकूने ४०० वेळा वार केल्याचा खुलासा करण्यात आला होता. 

दिशा कायद्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावणार: गृहमंत्री

सलमानने चौकशी दरम्यान हे सुध्दा सांगितले की, अंकित शर्मा यांची सर्वांनी मिळून नर्घृण हत्या केली होती. हत्या करण्यापूर्वी १० ते १२ जणांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर अंकित शर्मा यांना ओढत आम आदमी पक्षाचे निलंबित नगरसेवक ताहिर हुसेन यांच्या घराजवळ नेण्यात आले. त्याठिकाणी चाकूने त्यांच्या शरिरावर वार करुन हत्या करण्यात आली. 

पाकची भारताला साथ, व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये होणार सहभागी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा सलमानचा फोन पाळत ठेवण्यात आला होता तेव्हा त्याने एकाला सांगितले की हिंसाचारा दरम्यान आम्ही एकाची हत्या केली होती. या एका वाक्यावरुनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी सलमानची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने अंकित शर्मांची हत्या केल्याची कबुली दिली.  

अलिबागमधील मांडव्याजवळ बोट बुडाली, ८८ प्रवाशी सुखरुप

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:delhi police says 12 people stabbed 400 times knife during murder of ib employee ankit sharma