पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंदू सेनेच्या इशाऱ्यानंतर शाहिन बागेत जमावबंदी लागू, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

शाहिन बाग येथे आंदोलनस्थळी प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.

दिल्लीतील शाहिन बागमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) आंदोलन सुरु आहे. सुमारे अडीच महिन्यांपासून शाहिन बाग रस्ता बंद आहे. आता हिंदू सेनेने रविवारी हे आंदोलन बंद करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर शाहिन बाग येथे आंदोलनस्थळी प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी आंदोलकांना धरणे स्थळावरुन उठण्याचे अपील केले आहे. या संपूर्ण परिसरात कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे.

इंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत? अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी

हिंदू सेनेने टि्वट करुन निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी दि. १ मार्च (रविवार) रोजी दिल्लीतील शाहिनबाग येथे आंदोलन करत असलेल्या लोकांना हटवणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलिसांनी आंदोलनस्थळी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

...जीतकर हारनेवाले को केजरीवाल कहते हैं, थरुर यांचा टोला

हिंदू सेनेचे विष्णु गुप्ता यांनी टि्वट केले की, दिल्ली पोलिस शाहिन बागेतील सीएएविरोधी आंदोलनकर्त्यांना हटवण्यास अपयशी ठरले आहेत. भारतीय संविधानातील कलम १४, १९, २१ अंतर्गत सामान्य लोकांच्या मुलभूत अधिकाराचे हनन होत आहे. हिंदू सेना १ मार्च २०२० रोजी सकाळी १० वाजता सर्व राष्ट्रवादींना अडवण्यात आलेले रस्ते मोकळे करण्यासाठी आमंत्रित करते.

घरगुती गॅस सिलिंडर ५२ रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

पोलिसांनी शाहिन बाग परिसरात बॅरिकेडिंग केले आहे. त्याचबरोबर परिसरात सीआरपीसीचे कलम १४४ लागू केल्यामुळे कोणालाच तिथे आंदोलन करण्याची परवानगी नाही. याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. दरम्यान, १५ डिसेंबरपासून शाहिन बाग येथील रस्ते बंद आहेत. येथे सीएए विरोधात आंदोलन सुरु आहे.