पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाढदिवसाचा व्हिडिओ टिकटॉकवर टाकणे पडले महागात; तरुण अटकेत

टिकटॉक

दिल्लीमध्ये टिकटॉक व्हिडिओ तयार करणे एक तरुणाला महागात पडले आहे. वाढदिवस साजरा करत असताना या तरुणाने गोळीबार करत त्याचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ त्याने टिक टॉक अॅपवर टाकला होता. व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या तरुणाचा शोध घेत त्याला अटक केली आहे.

दिल्ली ते लाहोर बससेवाही स्थगित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजान सुईवालान असं या आरोपीचे नाव असून तो ३२ वर्षाचा आहे. दिल्लीच्या चांदनी महल भागामध्ये तो राहतो. १० ऑगस्टला रात्री फैजान त्याच्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा करत होता. याचवेळी त्याने रस्त्याच्या मध्ये उभं राहून देशी कट्ट्यातून गोळीबार केला. गोळीबाराचा हो व्हिडिओ त्याने टिकटॉकवर अपलोड केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. 

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या करंगळीला गंभीर जखम, शस्त्रक्रिया करावी 

फैयाज हा त्याच्या वडिलांसोबत हॉटेल चालवतो. पोलिसांनी सोमवारी त्याला अखाडेवाली गल्ली येथून अटक केली. त्याठिकाणी तो लपण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून देशी कट्टा जप्त केला आहे. त्याच्याविरोधात चांदनी महल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. 

पूरग्रस्तांसाठी बॉलिवूड कलाकारांची मदत का नाही?- अमेय खोपकर