पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत दंगलीची अफवा पसरवणाऱ्या २४ जणांना अटक

दिल्ली पोलिस

दिल्लीच्या अनेक भागांमध्ये दंगलीच्या अफवा पसरल्या प्रकरणी २४ जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दंगलीची अफवा पसवल्याप्रकरणी ईशान्य दिल्लीतून २१, मध्य दिल्लीतून २ आणि रोहिणी परिसरातून एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अफवा पसरवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी दोन एफआयआर दाखल केल्या आहेत.

निर्भया प्रकरण : दोषींच्या फाशीला पुढील आदेशापर्यंत पुन्हा स्थगिती

दिल्लीमध्ये रविवारी रात्री अचानक दंगलीची अफवा पसरल्यानंतर लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. घाबरलेल्या लोकांनी दुकानं बंद केली. या अफवेमुळे दिल्ली मेट्रोचे अनेक स्थानकं बंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी मोर्चेबांधणी केली आणि ही  एक अफवा असल्याचे सांगितले.

चीन, इराण, सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळा; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा सल्ला

दिल्लीतील ओखला येथील बटाला हाऊस परिसरात या अफवेमुळे चेंगराचेंगरी झाली यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हबीबल्लाह (३२ वर्ष) असे या मृत व्यक्तीचे नाव असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्स रुग्णालायत पाठवण्यात आला आहे. हबीबल्लाह हा बिहारच्या भागलपूर गावातील रहिवासी आहे. तो एका टेलरकडे नोकरी करत होता.

दिल्ली हिंसाचार : IBचे अधिकारी अंकित शर्मांच्या कुटुंबियांना १ कोटींची मदत