पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जामिया हिंसाप्रकरणी १० जणांना अटक

जामिया हिंसाप्रकरण

जामिया मिलिया विद्यापीठ हिंसाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मंगळवारी कारवाई करत १० जणांना अटक केली आहे. अटक केलेले विद्यार्थी नसल्याचं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. अटक केलेले १० जण हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे आहेत असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या दहा जणांचा शोध घेतला आहे. या लोकांनी दगडफेक केली, तसेच सरकारी संपत्तीचं मोठं नुकसानही केलं आहे. यातले सर्वजण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत असाही दावा पोलिसांचा आहे. 

सोशल मीडियांवरील अफवा, फेक न्यूज रोखा, केंद्राची राज्यांना सूचना

नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लाभलं होतं. आंदोलनकर्त्यांनी तीन बस पेटवून दिल्याची घटना घडली. आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला. 

या घटनेत चार बसनां आग लावण्यात आली होती. त्याचबरोबर १०० वाहानांना मोठं नुकसानं पोहोचलं आहे. यात काही स्थानिकांच्या आणि दिल्ली पोलिसांच्या वाहानांचाही समावेश आहे. आग आणि दगडफेकीमुळे अधिक नुकसान झालं आहे सध्या याचा अंदाज बांधणं कठीण असल्याचं दिल्ली पोलिसांचे प्रवक्ता डीसीपी मंदीप सिंह रंधावा म्हणाले.

बोईसरमधून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशींना अटक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Delhi Police arrested 10 people with criminal backgrounds in connection with Jamia Millia