पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गूड न्यूज : दिल्ली-मुंबई रेल्वेमार्ग लवकरच वेटिंग लिस्ट मुक्त

दिल्ली-मुंबई मार्गावर प्रवाशांची कायम गर्दी असते

दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता हे रेल्वेचे दोन मार्ग येत्या पाच वर्षांत वेटिंग लिस्ट मुक्त होणार आहेत. म्हणजे या मार्गावर कोणत्याही प्रवाशाला प्रवास करायचा असेल तर त्याला कन्फर्म तिकीट सहज उपलब्ध होईल. वेटिंग लिस्टमध्ये राहण्याची गरज पडणार नाही, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

प्रणिती शिंदेंना डावलले, काँग्रेसच्या महिला नगरसेविकेचा राजीनामा

विनोदकुमार यादव म्हणाले, येत्या काळात दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता या मार्गांवर रेल्वेकडून माल वाहतुकीसाठी अतिरिक्त रेल्वेरूळ टाकण्याचे नियोजन आहे. यासाठी २.६ लाख कोटी इतका खर्च येत्या १० वर्षांत येणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यावर सध्याच्या रेल्वे मार्गावरून केवळ प्रवासी गाड्याच धावू शकतील. प्रवासी गाड्यांची संख्या वाढवणेही शक्य होईल. त्यामुळे सर्व प्रवाशांना कोणत्याही वेटिंग लिस्टशिवाय सहजपणे या मार्गावर प्रवास करता येईल. दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता हे सध्या प्रवाशांची गर्दी असलेले मार्ग म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या मार्गावर जास्त गाड्या सुरू करण्याला प्राधान्य दिले जाईल. 

रेल्वे गाड्यांचा वेग वाढविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या बदलांच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. येत्या चार वर्षांत हे काम पूर्ण केले जाईल. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांचा वेग ताशी १६० किलोमीटर करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

... आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांनी बासरीवादनाने संसदीय समितीला केले थक्क

प्रवासी गाड्यांचा वेग ६० टक्क्यांनी वाढविण्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राजधानी रेल्वेगाड्या आता केवळ रात्रीत निर्धारित स्थानापर्यंत जाऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.