पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण : सर्व दोषींना एकाचवेळी फाशी द्या, केंद्राची याचिका फेटाळली

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणात चारही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला दिल्लीतील सत्र न्यायालयाने दिलेल्या स्थगितीविरोधात तेथील उच्च न्यायालयात केंद्र सरकारने दाखल केलेली याचिका बुधवारी फेटाळण्यात आली. त्याचवेळी सर्व दोषींनी आपल्या बचावासाठी सात दिवसांच्या आत कायदेशीर पर्यायांचा अवलंब करावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. दिल्ली उच्च न्यायालयातील न्या. सुरेशकुमार कैत यांनी सुनावणीवेळी हे आदेश दिले. सर्व दोषींना एकाचवेळी फाशी दिली जावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

CAA मुळे मुस्लिमांना कोणताही धोका नाही - रजनीकांत

केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेमध्ये म्हटले होती की, या प्रकरणातील दोषी मुकेश सिंह आणि विनयकुमार शर्मा यांचे सर्व कायदेशीर पर्याय वापरून झाले आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने फाशी देण्यात यावी. पण न्यायालयाने ही याचिका फेटाळली. या प्रकरणातील सर्व दोषींना एकाचवेळी फाशी दिली जावी, असे न्यायालयाचे म्हणणे आहे, असे न्यायाधीशांनी सांगितले.

'बेडूकउड्या मारुन दुसऱ्या पक्षाची लाचारी करणाऱ्यांनी मनसेला शिकवू नये'

या प्रकरणातील सर्व दोषींना शनिवारी, एक फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार होती. पण त्याआधी दिल्लीतील सत्र न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. त्यानंतर केंद्र सरकारने या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.