पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केजरीवाल-सिसोदिया यांनी हिंसाचारग्रस्त भागांना भेट द्यावी: हायकोर्ट

दिल्ली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

दिल्लीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थक आणि विरोधक आमने-सामने आले. यावेळी झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयाने सांगितले की, 'दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी हिंसाचार झालेल्या भागांना भेट दिली पाहिजे. 'तुमच्या भेटीमुळे लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल.', असे न्यायाधीशांनी सांगितले.

सोनिया गांधींच्या वक्तव्याचा जावडेकरांकडून समाचार
 
सुनावणी दरम्यान न्यायालयाने १९८४ साली झालेल्या शीख विरोधी दंगलीचा उल्लेख करत सांगितले की, आम्ही देशात दुसरे १९८४ होऊन देऊ शकत नाही. याप्रकरणी न्यायाधीश मुरलीधर सुनावणी करत आहेत. सुनावणी दरम्यान त्यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर आश्चर्य व्यक्त केले. सोबतच त्यांनी सॉलिसिटर जनरल यांना दिल्ली पोलिस आयुक्तांना वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचा सल्ला देण्यास सांगितले. 

पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांत मराठी विषय

दिल्ली हिंसाचारावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने सांगितले की, दिल्लीतील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. या सुनावणी दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने भाजप नेते कपिल मिश्रा यांचे वक्तव्य देखील एकले. यावेळी सॉलिसिटर जनरल, डीसीपी देव आणि सर्व वकील उपस्थित होते. दरम्यान, दिल्ली हिंसाचारामध्ये आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. 

हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांच्या कुटुंबीयांना १ कोटींची आर्थिक मदत