पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

JNU हिंसाचाराशी संबंधित सदस्यांचे मोबाईल जप्त करा: दिल्ली हायकोर्ट

जेएनयू हिंसाचार

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणावर मंगळवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान, जेएनयू हिंसाचाराशी जोडलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सदस्यांना समन्स जारी करुन त्यांचे मोबाईल जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. दुसरीकडे, गुगल आणि व्हॉट्सअ‍ॅपला डेटा सुरक्षित ठेवण्यास सांगितले आहे. तसंच, पोलिसांनी मागवलेले सीसीटीव्ही फुटेज लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जेएनयूला कोर्टाने दिल्या आहेत.

'राज्याचा खेळखंडोबा केलाय, हे दिवस बघण्यापेक्षा मेलेलं बरं'

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सुनावणी दरम्यान हायकोर्टाने गुगल आणि व्हॉट्सअ‍ॅपला सांगितले की, ते त्यांच्या धोरणानुसार ईमेल आयडीच्या आधारावर ग्राहकांच्या मूलभूत माहितीच्या आधारे डेटा जतन करा. दरम्यान, जेएनयूमध्ये ५ जानेवारी रोजी हिसांचाराची घटना घडली होती. हिंसाचार प्रकरणातील सीसीटीव्ही फूटेज आणि डेटा सुरक्षित ठेवण्याची मागणी करत जेएनयूच्या तीन प्राध्यापकांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 

निर्भया प्रकरणः फाशीचा मार्ग मोकळा, दोषींची न्यायसुधार याचिका

या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने पोलिस, गुगुल आणि व्हॉट्सअ‍ॅपला उत्तर मागितले आहे. याचिकाकर्ते जेएनयू प्राध्यापक अमित परामेस्वरन, अतुल सेन आणि विनायक सावंत यांनी मागणी केली आहे की, या घटनेशी संबंधित व्हॉट्सअ‍ॅप, गुगल, अ‍ॅपलचे मॅसेजसोबत 'युनिट अगेंस्ट लेफ्ट' आणि 'फ्रेंड्स ऑफ आरएसएस' यासारख्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा डेटा सुरक्षित ठेवण्याचे निर्देश द्यावेत. 

TikTok साठी शुटिंग सुरू होते, गोळी उडाली आणि त्याचा जीव गेला...