पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कन्हैयाकुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यास केजरीवाल यांची मंजुरी

कन्हैयाकुमार

केजरीवाल सरकारने जेएनयू देशद्रोह प्रकरणी जेएनयूएसयूचे माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार, उमर खालिदसह १० आरोपींविरोधात खटला सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. केजरीवाल सरकारच्या प्रॉसिक्यूशन डिपार्टमेंटने पोलिसांच्या स्पेशल सेलला मंजुरी दिली आहे. हे प्रकरण सुमारे एक वर्षांपासून दिल्ली सरकारकडे प्रलंबित होते. भाजपने दिर्घकाळापासून केजरीवाल सरकारला यावरुन घेरले होते. 

उल्लेखनीय म्हणजे १९ फेब्रुवारीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते की, देशद्रोह प्रकरणात आरोपी कन्हैयाकुमार व इतरांविरोधात खटला चालवण्यावरुन संबंधित विभागाला त्वरीत निर्णय घेण्यास सांगितले जाईल. दिल्लीतील एका न्यायालयाने आप सरकारला देशद्रोहाचा खटला चालवण्यास मंजुरीच्या मुद्द्यावर ३ एप्रिलपर्यंत स्टेट्स दाखल करण्यास सांगितले होते. त्याचदिवशी केजरीवाल यांनी हे वक्तव्य केले होते. दिल्ली पोलिसांनी या खटल्याला मंजुरी देण्याची आठवण करुन द्यावी, असे न्यायालयाने म्हटले होते. 

पुलवामा हल्लाः NIAला मोठे यश, सुसाइड बॉम्बरला मदत करणाऱ्याला अटक

दरम्यान, पोलिसांनी कन्हैयाकुमार, जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्यसमवेत इतर लोकांविरोधात न्यायालयात १४ जानेवारीला आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रात म्हटले होते की, आरोपींनी ९ फेब्रुवारी २०१६ ला जेएनयूतील एका कार्यक्रमात देशाविरोधात घोषणा देण्यात आला तसेच मोर्चा काढण्यात आला.

मुस्लिम आरक्षणामुळे मराठा आरक्षण धोक्यातः फडणवीस

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Delhi Govt okays prosecution of ex JNUSU president Kanhaiya Kumar for sedition in 2016 case