पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया बलात्कार- हत्या प्रकरण : 'त्या' नराधमांना २, ६५० दिवसांनी शिक्षा

आरोपींना शिक्षा

दिल्ली सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी  सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास करण्यात आली. या  चारीही दोषींनी फाशीला काही तास उरले  असताना अखेरच्या क्षणी केलेली याचिका दिल्ली न्यायालयानं फेटाळून लावली. १६ डिसेंबर २०१२ साली धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी २३ वर्षीय तरुणीचा बलात्कार केला होता. या प्रकरणातील दीर्घ लढ्यानंतर अखेर निर्भयाला न्याय मिळाला असून गुन्हा घडल्यापासून तब्बल २, ६५० दिवसांनी आरोपींना शिक्षा  मिळाली आले. 

कोरोनाशी लढ्यासाठी संकल्प आणि संयम दृढ करण्याची गरज : मोदी

 सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही  दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह या नराधमांना फाशी देण्यात आली. न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकावेळी ४ आरोपींना फाशी देण्यात आली आहे. 

गुरुवारी रात्री उशीरापर्यंत चालली सुनावणी 
या  चारीही दोषींनी फाशीच्या शिक्षेला अखेरच्या क्षणी स्थगिती मिळावी म्हणून दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं रात्री १२.०० वाजेच्या दरम्यान फेटाळून लावली.

या प्रकरणातील दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांच्या शिक्षेस स्थगिती देण्यासाठी कोणतेही ठोस कारण  निदर्शनास आणून देण्यात आलेले नाही, असं सुनावणीदरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा म्हणाले. त्यांनी फाशीच्या शिक्षेस स्थगिती  देण्यास नकार दिला.  राष्ट्रपतींनी दुसऱ्यांदा दयेची याचिका फेटाळल्यानंतर आता त्याची न्यायालयीन समीक्षा होऊ शकत नसल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने दोषींच्या वकिलांचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले. 

सरकारच्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई होणार: गृहमंत्री

आतापर्यंत २२ जानेवारी, १ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी दोषींना फासावर चढविण्यासाठी काढण्यात आलेले 'डेथ वॉरंट' कायद्यातील पळवाटांमुळे निष्प्रभ ठरले होते.