पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरणः फाशी जन्मठेपेत बदला, दोषी पवनची सुप्रीम कोर्टात याचिका

पवनकुमार गुप्ता

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील चौथा दोषी पवनकुमार गुप्ताने सर्वोच्च न्यायालयात न्यायसुधार याचिका (क्युरेटिव्ह पिटिशन) दाखल करुन फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालय मंगळवारी निर्भया प्रकरणातील चारही दोषींना वेगवेगळी नव्हे तर एकाच वेळी फाशी देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील केंद्राच्या याचिकेवर ५ मार्च रोजी सुनावणी करणार असल्याचे सांगितले. चारही दोषींवर डेथ वॉरंट जारी करण्यात आले असून तीन मार्च रोजी फाशी देण्यात येणार आहे. 

राज्यात लवकरच मुसलमानांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण

याप्रकरणी उर्वरित तीन दोषींनी अक्षय, विनय, मुकेश यांनी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशन आणि राष्ट्रपतींकडे दाखल केलेली दया याचिका यापूर्वीच फेटाळण्यात आली आहे. मुकेशने दया याचिका फेटाळण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिकाही दाखल केली होती. जी नंतर फेटाळण्यात आली. पवनने आतापर्यंत क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली नव्हती. आता त्याने फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर करण्याची विनंती केली आहे. 

इंदोरीकर महाराजांचा कोल्हापूरातील किर्तनाचा कार्यक्रम रद्द

तत्पूर्वी, या प्रकरणातील दोषी विनय शर्माचा आणखी एक प्रयत्न अपयशी ठरला. राष्ट्रपतींच्या दया याचिका फेटाळण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत विनयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. स्वतःला मनोरुग्ण सांगत फाशी टाळण्याची त्याने मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने विनय मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे सांगितले. न्यायालयाने सुनावणीनंतर निर्णय सुरक्षित ठेवला होता.