पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण : दोषी विनय शर्माची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

विनय शर्मा

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक दोषी विनय शर्मा याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली. या प्रकरणातील चारही दोषींना शनिवारी सकाळी फाशी देण्यात येणार होती. पण दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या फाशीला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली. 

सरकारला दिलासा, GST उत्पन्नात जानेवारीत मोठी वाढ

या प्रकरणी चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुकेश सिंह, पवनकुमार गुप्ता, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा अशी या दोषींची नावे आहेत. त्यापैकी विनय शर्मा याने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. ती फेटाळण्यात आली. हे चौघेही दोषी सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात आहेत. तिथेच त्यांना फाशी देण्यात येणार आहे. फाशीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पण शुक्रवारी दिल्लीतील न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत फाशीला स्थगिती दिली.