निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी अक्षय सिंगची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे अक्षय सिंगच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. तीन सदस्यांच्या खंडपीठाने बुधवारी अक्षयच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी केली. यावेळी सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत अक्षयची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
Supreme Court rejects review petition of Akshay Kumar Singh, one of the convicts in the 2012 Delhi gang-rape case. pic.twitter.com/5fhmZI94bW
— ANI (@ANI) December 18, 2019
'जनतेचा कौल नाकारुन स्वार्थासाठी आलेले हे सरकार'
दरम्यान, या प्रकरणातील अन्य आरोपी मुकेश, पवन गुप्ता, विनय शर्मा यांच्या फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने याआधीच फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता चारही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. कोर्टाने सांगितले आहे की, बचाव पक्षाद्वारे दिलेले युक्तिवाद यापूर्वी सुनावण्यात आले आहेत. याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा कोणताही आधार सापडलेला नाही असे सांगत सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय सुनावला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर निर्भयाच्या दोषींना फाशीच्या शिक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे.
रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी पुढील वर्षही सशुल्क कॉल्सचे, वाचा
अक्षयचे वकील एपी सिंह यांनी सुनावणी दरम्यान, याप्रकरणाचा तपास आणि पीडितेच्या जबाबावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, पीडितेने शेवटच्या जबाबामध्ये अक्षय किंवा इतर दोषींचे नाव घेतले नाही. मीडिया आणि राजकिय दबावामुळे अक्षयला शिक्षा देण्यात आली. तो निर्दोष आणि गरीब आहे. भारत अहिंसेचा देश आहे आणि फाशी मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. यावर, कोर्टाने सांगितले आहे की तुम्ही ठोस आणि कायदेशीर तथ्ये ठेवावीत. आमच्या निर्णयामध्ये काय उणीव आहे आणि का याचा पुनर्विचार करावा?, असा सवाल कोर्टाने केला आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा