पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण: ७ जानेवारीला दोषींच्या डेथ वॉरंटवर होणार सुनावणी

निर्भया प्रकरणातील आरोपी

निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील  दोषी अक्षय सिंगची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर सर्वांचे लक्ष पतियाळा हाऊस कोर्टाकडे लागले होते. मात्र पतियाळा हाऊस कोर्टाने दोषींच्या डेथ वॉरंट याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली. त्यामुळे आता आरोपींच्या डेथ वॉरंटची सुनावणी ७ जानेवारी रोजी होणार आहे. निर्भयाच्या कुटुंबियांनी दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत डेथ वॉरंट जारी करावे यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.

 

जयपूरमधील ९ बॉम्बस्फोटांप्रकरणी चौघे दोषी, एकाची सुटका

निर्भया प्रकरणातील दोषींच्या डेथ वॉरंटवरील सुनावणी पुढे ढकलल्यामुळे निर्भयाची आई दु:खी झाल्या. कोर्टाच्या निर्णयानंतर निर्भयाची आई रडू लागली. त्यांनी सांगितले की, कोर्टाला दोषींचे सर्व अधिकार दिसतात, आमचे अधिकार दिसत नाहीत, असे सांगत त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

INDvsWI,2nd ODI Live: लोकेश विराटनंतर रोहितही माघारी

दरम्यान, या प्रकरणातील दोषी अक्षय सिंगची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने बुधवारी फेटाळली. त्यामुळे अक्षय सिंगच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच, या प्रकरणातील अन्य आरोपी मुकेश, पवन गुप्ता, विनय शर्मा यांच्या फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने याआधीच फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता चारही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

अक्षय कुमार याचा अमित शहांना महत्त्वाचा सल्ला