पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीतील आगीच्या चौकशीचे आदेश, मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये देणारः केजरीवाल

अरविंद केजरीवाल (Sanchit Khanna)

दिल्लीतील राणी झांसी रस्त्याजवळील धान्य बाजारात रविवारी पहाटे भीषण आग लागून ४३ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दिल्ली सरकारने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनास्थळावर पोहोचलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होईल. सात दिवसांच्या आत अहवाल मागितला आहे. त्याचबरोबर या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना १०-१० लाख रुपये भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पंतप्रधान सहाय्यता निधीतून मदत जाहीर केली आहे.

अग्निशामक दलाला पहाटे ५ वाजून २२ मिनिटांनी धान्य बाजारात आग लागल्याचा माहिती मिळाली. अग्निशामक दलाच्या सुमारे ३० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या.

अग्निशामक दलाने घटनास्थळावरुन ५० जणांना वाचवण्यात आले आहे. जखमींना दिल्लीतील एलएनजेपी, सफदरजंग, आरएमएल आणि हिंदूराव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.