पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Delhi Exit Poll 2020: दिल्लीत पुन्हा एकदा केजरी सरकार, भाजपच्याही जागा वाढणार

अरविंद केजरीवाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपले आहे. आतापर्यंत आलेल्या वृत्तानुसार यावेळी दिल्लीत सुमारे ५७.०६ टक्के मतदान झाले आहे. अद्याप अंतिम आकडेवारी समोर आलेली नाही. मतदान संपल्यानंतर विविध वृत्त वाहिन्या आणि संस्थांनी आपले एक्झिट पोल जारी केले आहेत. यामध्ये पुन्हा एकदा दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुमारे सर्वच एक्झिट पोलमध्ये 'आप'ला ५५ पेक्षा अधिक जागा मिळताना दिसत आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे दिसत आहे. परंतु, ते बहुमताच्या आकड्यांपेक्षा खूप मागे राहण्याचा अंदाज आहे. एक्झिट पोलनुसार यावेळी काँग्रेसचे सर्वांधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला एका जागेवरच आटोपते घ्यावे लागणार आहे. 

दिल्ली

Channel/Agency AAP बीजेपी कांग्रेस अन्य
Times Now-CNX 44 26 00 00
Aaj Tak/India Today-Axis 59-68 02-11 00 00-04
Republic-Jan Ki Baat 48-61 9-21 0-1 00
ABP-CVoter 42-54 04-16 00-04 00
NewsX-Neta App 50-56 10-14 00

00

POLL of POLL 00 00 00 00

टाइम्स नाऊ एक्झिट पोल

टाइम्स नाऊच्या एक्झट पोलनुसार दिल्लीत आपचे सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलनुसार आपला ४४, भाजपला २६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला खातेही उघडता येणार असल्याचे या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आले आहे. 

न्यूज एक्स-NETA

न्यूज एक्स-NETA च्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत 'आप'ला ७० पैकी ५५ जागा मिळू शकतात. न्यूज एक्सच्या सर्व्हेमध्ये भाजपला १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या खात्यात अवघी एक जागा येण्याचा अंदाज आहे.

जन की बात
जन की बातकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार आप दिल्लीत ५५ जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तर भाजपला १५ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला खातेही उघडता येणार नाही. 

इंडिया न्यूज आणि न्यूज नेशन

इंडिया न्यूज आणि न्यूज नेशनच्या मते आप ५५ जागांसह सत्ता स्थापन करेल. तर भाजपला १४ आणि काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागेल. 

सुदर्शन न्यूज

सुदर्शन न्यूजच्या एक्झिट पोलनुसार यावेळी भाजपच्या कामगिरीत मोठी सुधारणा होताना दिसत आहे. यांच्या सर्व्हेनुसार भाजप यावेळी २६ जागी विजयी होऊ शकते. पण हा आकडा बहुमतापेक्षा दहांनी कमी आहे. तर आपला ४२ जागा मिळू शकतात. तर सलग १५ वर्षे दिल्लीत सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसला अवघ्या २ जागा मिळू शकतात.

एबीपी न्यूज-सी वोटर

एबीपी न्यूज-सी वोटरने आपल्या सर्व्हेत आम आदमी पार्टीला सर्वांधिक ५६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. या सर्व्हेत भाजपला १२ आणि काँग्रेसला दोन जागेवर समाधान मानावे लागेल असे म्हटले आहे. बहुतांश सर्वेक्षणात आपला ५५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर एबीपीने आपला एक जागा जास्त जिंकण्याचा अंदाज वर्तवला आहे. 

इंडिया टीव्ही

इंडिया टीव्हीच्या सर्व्हेनुसार आम आदमी पक्ष दिल्लीत सरकार स्थापन करेल. या सर्वेक्षणात 'आप'ला ४४ तर भाजपला २६ जागा मिळताना दिसत आहे. तर काँग्रेसला खातेही उघडता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.