पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी ताजमहालही विकतील, राहुल गांधींचा टोला

काँग्रेस नेते राहुल गांधी

''मोदींनी मेक इन इंडियाचा नारा दिला, मात्र एकही फॅक्टरी सुरु केली नाही. एअर इंडिया, हिंदुस्थान पेट्रोलियम, रेल्वे  इतकंच नाही तर लाल किल्ला सुद्धा विकायला निघाले आहेत. ते ताजमहालही विकतील'', अशी टिका काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत असताना त्यांनी भाजप आणि आम आदमी पार्टीला लक्ष्य केलं. 

BMC Budget: जाणून घ्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

''मोदींनी अदानीला विमानतळं, बंदरं देऊन टाकली. पहावं तिथे अदानी आणि अंबानी यांचीचं नावं आहेत. हे मोदी सरकार न राहता अदानी- अंबानी सरकार झालं आहे. सर्व नफा केवळ १५ लोकांनाच मिळत आहे.  हे सरकार एअर इंडिया, हिंदुस्थान पेट्रोलियम, रेल्वे  इतकंच नाही तर लाल किल्ला सुद्धा विकायला निघाले आहेत, ते ताजमहलही विकतील'' अशी  टीका  राहुल गांधींनी केली. 

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा मुलाने केला भाजपमध्ये प्रवेश

''मेक इन इंडियाचा प्रयोग यशस्वी राबवला तर किमान २ कोटी रोजगार निर्मिती होऊ शकते मात्र पंतप्रधान मोदी किंवा मुख्यमंत्री केजरीवाल यांना त्यांची बिलकुल चिंता नाही'', असंही राहुल गांधी प्रचारसभेत म्हणाले. 

''देशात तरुणांची काही कमी नाही, तरुण वर्ग मेहनती आहे, मात्र चूक देशांच्या पंतप्रधानांची आणि  दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची आहे, कारण बेरोजगारीवर त्यांना तोडगा काढायचा नाही, त्यांच्याकडे यावर तोडगा काढण्याची मुळात शक्तीच नाही'' अशी बोचरी टीका करत त्यांनी भाजप आणि आम आदमी पक्षाला धारेवर धरलं. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना देखील त्यांनी लक्ष्य केलं. ''जवळपास तीन तास सितारमण अर्थसंकल्पाबद्दल बोलत होत्या मात्र या तीन तासांत बेरोजगारीवर चकार शब्द काढला नाही'' असं म्हणत त्यांनी  अर्थमंत्र्यांनाही धारेवर धरलं.

विमानातच महिलेची प्रसूती, कोलकात्यात इमर्जन्सी लँडिंग