दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. आतापर्यंत जे निकाल समोर आले आहेत. त्यात 'आप'ला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. १४ जागांवर भाजप पुढे आहे. काँग्रेसला यावेळीही खाते उघडता आलेले नाही. मतमोजणी अद्याप सुरु आहे. याचदरम्यान, काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अधीररंजन चौधरी यांनी काँग्रेसच्या पराभवामुळे चांगला संदेश गेला नसल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसचा सुपडा साफ, दिग्विजय सिंह यांनी आळवला EVMचा मुद्दा
'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस नेते चौधरी म्हणाले की, 'आप'ची तिसऱ्यांदा सत्ता येणार आहे, हे सर्वांना माहीत होते. भाजप आणि धार्मिक अजेंड्याविरोधात आपचा विजय महत्त्वाचा आहे.
Congress MP AR Chowdhury: Everyone knew that Aam Aadmi Party will return to power for the third time. Congress's defeat will not send a good message. The victory of AAP against the Bharatiya Janata Party & its communal agenda is significant. pic.twitter.com/HD2vQhFfpn
— ANI (@ANI) February 11, 2020
आतापर्यंत समोर आलेल्या निकाल आणि कलानुसार काँग्रेसची दुरवस्था झाली आहे. दिल्ली निवडणुकीच्या निकालात आतापर्यंत काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार आप ५६ आणि भाजप १४ जागांवर आघाडीवर आहे.
दिल्लीत काँग्रेस निराशाजनक कामगिरी करणार माहिती होते
मतांच्या टक्केवारीतही काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. २०१५ मध्ये काँग्रेसला सुमारे १० टक्के मते मिळाली होती. यावेळी आतापर्यंत ५ टक्क्यांच्या आसपास मते मिळाली आहेत.