पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींकडूनही केजरीवालांना शुभेच्छा!

नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी

सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप) दिल्लीतील आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. आम आदमी पक्षाच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षासह मुख्यमंत्री अरविद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. मोदींनी ट्विटच्या माध्यमातून या शुभेच्छा दिल्या आहेत.  मोदींनी ट्विटमध्ये लिहलंय की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्याबद्दल आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचे अभिनंद! दिल्लीतील जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा!

देश 'मन की बात'वर नव्हे; 'जन की बात'वर चालतो: उद्धव ठाकरे

यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्ली विधानसभेतील यशाबद्दल मुख्यंत्री अरविंद केजरीवाल आणि पक्षाला शुभेच्छा दिल्या होता. जनतेने दिलेला कौल भाजपला स्वीकार आहे. आम्ही विरोधी बाकावर बसून जनतेची सेवा करु, असे ट्विट जेपी नड्डा यांनी केले होते. या ट्विटमधून त्यांनी आम आदमी पक्षा दिल्लीच्या विकास करेल, अशी आशा व्यक्त केली होती.  

'भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही'

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसला पुन्हा एकदा दिल्ली विधानसभेत मोठा धक्का बसला आहे. एकेकाळी १५ वर्ष सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खातेही उघडता आलेले नाही.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Delhi Election Results 2020 Wishing very best PM Modi congratulates Arvind Kejrwial on Delhi victory