पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG : 'दिल की बात' प्रेम मोदींवर अन् संसार केजरीवालांसोबत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजपला पुरुन उरले. ज्या देशातील लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेमात वेडावले आहेत त्यांच्या राज्यात राजधानीचं तक्ख्त राखून पुन्हा राज्य करण्याची संधी दिल्लीकरांनी केजरीवालांना दिली. केजरीवालांनी भाजपला शह देत गड राखणे फार चमत्कारिक नाही. याच कारण १५ वर्षे दिल्लीवर अधिराज्य गाजवणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं राज्य उद्धवस्त करुन ते इथवर पोहोचले आहेत. शीला दीक्षित या देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत ज्यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे केजरीवालांनी पदार्पणात केलेल्या कामगिरीचा विक्रम अजूनही अबाधित असल्याचे वाटते.  त्यांच्या या कामगिरीमुळे भाजपचा यंदाचा पराभव किरकोळ आहे. पण भाजपच्या शक्तीप्रदर्शनामुळे प्रसारमाध्यमांनी भाजपचा फुगा विनाकारण फुगवला अन् तो फुटल्याचे पाहायला मिळाले.

Delhi Election Results: भाजपसाठी दिल्ली निकालाचा अर्थ काय ?

जसं खाणीत हिरा मिळतो तसंच आपल्याकडे आंदोलनात नेता मिळतो. केजरीवालांसारखा आयआरएस अधिकारी आपल्याकडील राजकारणात अवतरला तोही एका आंदोलनातूनच. लोकपाल आंदोलनातून समोर आलेल्या चेहऱ्याने आम आदमी डोळ्यासमोर ठेवून नवा पक्ष स्थापन केला. अन् २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीचे तक्ख्त पलटण्याचा पराक्रम करुन दाखवला. निवडणुकीत काँग्रेसचा गड उद्धवस्त करत केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. दिल्लीत आम आदमीनं सरकार स्थापन तर केले. पण पाच वर्षांचा कार्यकाळ सोडा अवघ्या ४८ दिवसांतच केजरीवालांनी राजीनामा देत दिल्लीकरांच्या भावना दुखावल्या. तोपर्यंत आपण मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या आम आदमीने रस्त्यावर बसून आंदोलन केल्याचे साक्षीदार झालो होतो. लोकपालच्या मुद्यावरुन राजीनामा देण्याचा निर्णयाबद्दल त्यांनी दिल्लीकरांची माफीही मागितली. पण त्यांच्या या निर्णामुळे  दिल्लीनं अन् दिल्लीकरांनी पहिल्यांदा ३६३ दिवस राष्ट्रपती राजवट अनुभवली.

दिल्लीत 'आप'मतलब्यांचा पराभव; सामनातून भाजपवर निशाणा

अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येवून विकेट टाकणाऱ्या फलंदाजाच्या कारकीर्दीबद्दल नेहमी शंका निर्माण होते. राजकीय मैदानात अशीच शंका केजरीवालांबाबतही निर्माण झाली. हा माणूस मोठ्या रेसचा घोडा नव्हे अशा प्रतिक्रियाही त्यावेळी उमटल्या. प्रशासकीय कामाचा प्रत्यक्ष अनुभव आणि चांगला अधिकारी राजकारणात फारकाळ अधिराज्य गाजवणार नाही, असे बोलले गेले. हे सर्व केजरीवालांनी खोडून काढले आहे. त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीमुळे दिल्लीच नव्हे देशभरात या माणसाची एक वेगळी छबी निर्माण होत आहे.  

Delhi Results: 'आप'ने गड राखला; भाजप एक अंकी तर काँग्रेसचा भोपळा!

लोकसभा निवडणुकीपूर्वी चार-पाच महिने दिल्लीत असताना दिल्लीकरांच्या मनात केजरीवालांबाबत नेमकी भावना काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेकजण केजरीवालांबाबत व्यक्त होताना पंतप्रधान मोदींचे नाव पहिल्यांदा घ्यायचे. काहीजण 'आप'च्या कामाचं कौतुक तर करायचे पण केजरीवालांबद्दल व्यक्तिगत भेटीत अवमानकारकही बोलायचे. (लोकप्रतिनिधींबद्दल अपशब्द बोलण्याचा लोकांना अलिखित अधिकार असतोच) ही लोक भावना समजण्यापलीकडची होती. प्रजासत्ताक दिनानंतर प्रत्येकवर्षी राजभवनाच्या समोर रायसीना रस्त्यावर आयोजित करण्यात 'बीटिंग द रिट्रीट' (Beating The Retreat) सोहळ्यात याची उकल झाली. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थितीत होते.

अरविंद केजरीवाल यांचा येत्या रविवारी शपथविधी

कार्यक्रम झाल्यानंतर मान्यवर मंडळी निघून गेल्यानंतर मोदी थेट प्रक्षेक गॅलरीत जात जनतेसोबत हस्तांदोलन करताना पाहायला मिळाले. मोदींमधील हीच चुंबकीय शक्ती कदाचित दिल्लीकरांना केजरीवालांसोबत उघड व्यक्त होण्याला प्रवृत्त करत नसावी. केजरीवालांनी थप्पड मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याला पुष्पगुच्छ दिल्याची घटनाही आपण ऐकली असेल. या घटनेमुळे केजरीवालांनी अनेकांच्या मनातही स्थान मिळवले असेल. पण उघडपणे केजरीवांलावर प्रेम व्यक्त करणारा मला दिल्लीत कोणी भेटला नाही. पण दिल्ली विधानसभेच्या निकालातून त्यांच्यावरील प्रेम आपल्या समोर आहे. दिल्लीकरांच्या मनात मोदींविषयी प्रेम असेल नव्हे आहेच पण संसार त्यांना केजरीवालांसोबतच करायचा आहे, अशीच भावना निकालानंतर मनात तरंगत आहे. 

-सुशांत जाधव

Email -Sushantjournalist23@gmail.com

Twitter- @2010Sushj

Mob-9762054777

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Delhi Election Results 2020 Results CM Arvind Kejriwal vs PM Narendra Modi Love Factor in Delhi People read special blog written by sushant jahdv