पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Delhi Election Results: ७० पैकी ६७ जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त

काँग्रेसचा मोठा पराभव

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाल काँग्रेसला मोठा धक्का देणारा आहे. यंदाच्या निवडणुकीत पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. याशिवाय ७० जागेपैकी ६७ जागेवरील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. एकेकाळी सलग १५ वर्ष सरकार चालवणाऱ्या काँग्रेसवर ओढावलेली ही नामुष्की एखाद्या त्सुनामी सारखीच आहे. गांधी नगर, बादली आणि कस्तूरबा नगर या तीन मतदार संघातील उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवण्यात यश आले. दुसरीकडे २०१५ च्या निवडणुकीत आपच्या तिकीटावर निवडणूक लढलेल्या आणि यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून चांदणी चौक या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अलका लांबा यांचे डिपॉझिट देखील जप्त झाले आहे. 

पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींकडूनही केजरीवालांना शुभेच्छा!

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना १० हजार रुपयांचं डिपॉझिट निवडणूक आयोगाकडे जमा करावं लागतं. एकूण मतांच्या १६ टक्के मतं राखता आली नाहीत तर उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होतं असते.  २०१५ च्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. त्यावेळी आम आदमी पक्षाने ६७ जागेवर यश मिळवले होते. तर भाजपला ३ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागा जिंकत भाजपने कामगिरी सुधारण्याचे संकेत दिले. मात्र विधानसभेत भाजपला लोकसभेप्रमाणे कामगिरी करणे जमलं नाही.  

Delhi Election Results: भाजपसाठी दिल्ली निकालाचा अर्थ काय ?

काँग्रेसने जनतेने दिलेला कौल स्वीकारला आहे. दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चौपडा यांनी भाजप आणि आप यांच्यातील ध्रुवीकरणामुळे काँग्रेसला फटका बसल्याचे म्हटले आहे. नव्या संकल्पासह पक्षाला पुन्हा उभारी देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.