पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Delhi Results: 'आप'ने गड राखला; भाजप एक अंकी तर काँग्रेसचा भोपळा!

आम आदमी पक्षाने सत्ता कायम राखली

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह २०० खासदार आणि ११ मुख्यमंत्र्यांसमोर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालच भारी ठरले आहेत. भाजपच्या जोरदार प्रचारानंतरही दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास दाखववत दिल्लीची सत्ता पुन्हा एकदा आम आदमी पक्षाच्या हातात दिली आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ६२ जागा जिंकण्यात यश मिळवले.  

Delhi Election Results: भाजपसाठी दिल्ली निकालाचा अर्थ काय ?

आम आदमी पक्षाची सत्ता पलटून लावण्यासाठी जोरदार प्रचारमोहिम घेऊनही भाजपला केवळ ८ जागांवरच समाधान मानावे लागले. कौलहाती येण्यास सुरुवात झाल्यानंतर भाजपचा आघाडीवरील आकडा २० च्या घरात होता. विद्यमान उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया पिछाडीवर होते.  भाजप किमान २० पेक्षा अधिक जागा जिंकेल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र हा कल कायम न राहता आपच्या बाजूने झुकला. सिसोदिया यांच्यासह आपनेही मुसंडी मारत ६० चा आकडा पार केला. 

विजयानंतर केजरीवाल म्हणाले, दिल्लीवासियांनो 'आय लव यू!'

दुसऱ्या बाजूला काँग्रेसला आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यात अपयश आले. त्यांना मागीलवर्षीप्रमाणे यंदाही खाते उघडण्यात अपयश आले. एवढेच नाही तर २०१५ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. ७० पैकी ६७ जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ६७ जागा जिंकल्या होत्या तर भाजपला ३ जागा मिळाल्या होत्या. भाजपने यंदाच्या निवडणुकीत फक्त ५ जागा अधिक मिळवत दिल्ली विधानसभेतील आकडा ८ वर नेला. 

Delhi Election Results: ७० पैकी ६७ जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त

अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी आपल्या निवासस्थानी ननिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे. केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदार संघातून  ४६ हजार ७५८ मते मिळवत भाजपच्या उमेदवाराला २१ हजार ६९७ इतक्या मताधिक्याने पराभूत केले. या मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवाराला  ३ हजार २२० मते मिळाली. तर भाजपच्या उमेदवाराला २५ हजार ६१ मते पडली.

 देश 'मन की बात'वर नव्हे; 'जन की बात'वर चालतो: उद्धव ठाकरे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Delhi Election Results 2020 AAP again gets Delhis mandate to form government wins 62 seats BJP 8 Seates Congres No Gain Again