दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या आपल्या कार्यकर्त्यांना खास सूचना दिली आहे. दिल्लीतील निवडणुकीच्या निकालानंतर विजयाचा जल्लोष करत असताना कोणीही फटाके फोडू नये, असे केजरीवालांनी सांगितले आहे.
Delhi Exit Poll 2020: दिल्लीत पुन्हा एकदा केजरी सरकार, भाजपच्याही जागा वाढणार
आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकालाच्या पार्श्वभूमीवर सध्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पुन्हा विजयी होणार याचा त्यांना आत्मविशास असून विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी सुरु आहे. विजयाचा आनंद साजरा करत असताना कोणीही फटाके फोडू नयेत, असा सल्ला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्याची माहितीही पदाधिकाऱ्यांनी दिली. फटाक्यामुळे प्रदुषणाच्या समस्या वाढू नये, यापार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांनी कार्यकर्त्यांना अशी सूचना दिली आहे.
... या तीन कारणांमुळे दिल्लीत विजयाचा भाजप नेत्यांना विश्वास
आयटीओस्थित पक्षाच्या मुख्यालयात विजयाचा आनंद साजरा करण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. एक्झिटपोलच्या अंदाजानुसार, दिल्ली विधानसभेत पुन्हा एकदा आप बाजी मारणार असल्याचे स्पष्ट होत आहे. हा अंदाज खरा ठरेल, असा आप कार्यकर्त्यांना विश्वास आहे. अंतिम कौल उद्या सर्वांसमोर येणार आहेत.