दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने पुन्हा निर्विवाद यश मिळवले. विजयाची हॅटट्रिक नोंदवल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीकरांसह हनुमानाचे आभार मानले. विजयानंतर केजरीवाल यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. दिल्लीवासियांनो आय लव यू! अशा शब्दांत त्यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. एवढेच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी हनुमानाचेही आभार मानत तुम्ही मला मुलगा म्हणून स्वीकारल्याचा उल्लेखही केला.
#WATCH: Aam Aadmi Party (AAP) chief Arvind Kejriwal addresses the party workers. #DelhiElectionResults https://t.co/CfeNtzk8LZ
— ANI (@ANI) February 11, 2020
'भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही'
केजरीवाल म्हणाले की, हा विजय फक्त दिल्लीचा नव्हे तर संपूर्ण भारताचा विजय आहे. हनुमानाच्या कृपेने पुढील पाच वर्ष सरकार चालवू. दिल्ली विधानसभेचा निकाल अधिकृतरित्या जाहीर झाला नसला तरी आपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. अधिकृत आकडेवारी समोर येण्यापूर्वीच आम आदमी पक्षावर शुभेच्छाचा वर्षाव सुरु झाला आहे.
'भारताचा आत्मा वाचवल्याबद्दल दिल्लीवासीयांचे आभार'
दिल्ली विधानसभेच्या निकालावर भाष्य करताना केजरीवाल म्हणाले की, मी मनापासून दिल्लीकरांचे आभार मानतो. तुम्ही तिसऱ्यांदा आपल्या मुलावर विश्वास दाखवला. हा विजय दिल्लीतील प्रत्येक कुटुंबियांचा विजय आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून दिल्लीकरांनी नव्या राजकारणाला जन्म दिला आहे. हे राजकारण देशासाठी एक उत्तम उदाहरण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.