पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलाम! बाळाला घरमालकाकडे सोडून डॉक्टर पती-पत्नीकडून कोरोनाबाधितांवर उपचार

कोरोनाविरोधातील लढाईत सहभागी झालेले दिल्लीतील डॉक्टर दाम्पत्य

देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाविरोधातील या लढाईमध्ये आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी दिवस-रात्रं मेहनत करत आहेत. दिल्लीमध्ये कोरोनाविरोधातील लढाईत सहभागी झालेल्या अशाच एका डॉक्टर पती-पत्नींचे कौतुक होत आहे. आपल्या १३ महिन्यांच्या बाळाला घरमालकाकडे सोडून हे डॉक्टर पती-पत्नी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. 

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा २३ हजार पार

दिल्लीतील हे डॉक्टर पती-पत्नी वेगवेगळ्या रुग्णालयात काम करत आहेत. डॉक्टर राजीव हे रंजन दादा देव रुग्णालयात काम करतात. तर त्यांची पत्नी डॉ. रश्मी आचार्य भीझू रुग्णालयात काम करतात. दोघेही आपत्कालिन विभागामध्ये ड्यूटी करत आहेत. ज्याठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासोबत त्यांचे स्क्रिनिंग देखील केले जाते. 

मेट्रो, मान्सूनपूर्व कामे, पिठांच्या गिरण्यांना लॉकडाऊनमधून सूट

डॉक्टर पती-पत्नी गेल्या काही दिवसांपासून घरी जात नाहीत. त्यांनी त्यांच्या १३ महिन्याच्या बाळाला घरमालकाजवळ ठेवले आहे. याबद्दल डॉक्टर दाम्पत्यांनी सांगितले की, लहान बाळ असल्यामुळे त्याला लगेच कोरोनाची लागण होऊ शकते यासाठी आम्ही दोघांनी रुग्णालयातून घरी न जाण्याचा निर्णय घेतला. मुलाला कोण सांभाळणार याची चिंता आम्हाला होती. त्यामुळे आम्ही आमच्या घरमालकाकडे मदत मागितली. ते आमच्या बाळाचा सांभाळ करत आहेत. आम्ही काम करताना प्रत्येक तीन तासानंतर बाळाला व्हिडिओ कॉल करतो.', असे त्यांनी सांगितले. 

अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे ५०,००० जणांचा मृत्यू

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:delhi doctor couple is treating coronavirus patient leaving the child on the trust of landlord