पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशाविरोधी भाषण करणाऱ्या शरजीलची रवानगी पोलिस कोठडीत

शरजील इमाम

देशद्रोहाच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या शरजील इमामला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी बुधवारी शरजील इमाम याला दिल्लीतील एका न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने शरजीलची रवानगी पोलिस कोठडीमध्ये केली आहे.

जामिया हिंसाचार: ७० संशयितांचे फोटो जारी करत पोलिसांनी ठेवले बक्षीस

डीसीपी राजेश देव यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी शरजील इमानची ५ दिवसांची कोठडी मागितली होती. देशविरोधी भाषण करणारा जवाहर लाल नेहरू यूनिवर्सिटीचा विद्यार्थी शरजील इमामला दिल्ली पोलिसांनी मंगळवारी बिहारमधील जहानाबाद येथून अटक केली होती. भडकाऊ भाषणे केल्याच्या आरोपाखाली देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यापासून शरजील फरार होता. सोशल मीडियावर शरजीलचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत तो आसामबाबत प्रक्षोभक भाषण करताना दिसत होता. 

मनसेच्या ९ फेब्रुवारीच्या मोर्चाचा मार्ग ठरला

शरजीलने आसामला भारतापासून वेगळे करण्याचे वक्तव्य केले होते. १६ जानेवारीच्या एका ऑडिओ क्लिपमध्ये इमामने असे म्हटले होते की, आसामला भारतापासून दूर केले पाहिजे आणि धडा शिकविला पाहिजे. कारण तेथे बंगाली हिंदू आणि मुस्लिम या दोघांची हत्या केली जात आहे. अशी माहिती सुध्दा पुढे येत आहे की, त्याने असेही म्हटले आहे की जर तो पाच लाख लोकांना एकत्र करू शकला तर आसामला भारतापासून कायमचा विभक्त केले जाऊ शकते.  

प्रशांत किशोर आणि पवन वर्मांची जदयूमधून हकालपट्टी