पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ, ईडीने मागितली अटकेची परवानगी

पी चिदंबरम

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीच्या एका न्यायालयात आयएनएक्स मीडियाशी संबंधित मनी लाँड्रिंग खटल्याप्रकरणी माजी अर्थ मंत्री पी.चिदंबरम यांना अटक करण्याची परवानगी मागितली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी शुक्रवारी ईडीकडून हजर होत विशेष न्यायाधीश अजयकुमार कुहार यांना चिदंबरम यांच्या चौकशीसाठी अटकेची आवश्यकता असल्याचे सांगितले.

आपलंच हेलिकॉप्टर पाडलं: ६ अधिकाऱ्यांवर हवाईदलाची कारवाई

मेहता म्हणाले की, मनी लाँड्रिग एक वेगळा गुन्हा आहे, त्यामुळे त्यांना अटकेची परवानगी देण्यात यावी. परंतु, चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी याला तीव्र विरोध केला.

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, ४० हजार काढता येणार