पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रॉबर्ट वाड्रांना परदेशात जाण्यास परवानगी पण लंडनसाठी नकार

रॉबर्ट वाड्रा

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना दिल्ली उच्च न्यायालयाने परदेशी जाण्यास परवानगी दिली आहे. मनी लाँड्रिग खटल्याचा सामना करत असलेले वाड्रा यांनी उपचारासाठी ६ आठवड्यासाठी परदेशात जाण्याची न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. परंतु, न्यायालयाने त्यांना लंडनमध्ये जाण्यास मनाई केली आहे. वाड्रा हे आपल्या उपचारासाठी अमेरिका आणि नेदरलँडला जाऊ शकतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

तुमचा जामीन रद्द का करु नये, कोर्टाचा रॉबर्ट वाड्रांना सवाल

विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी हा निर्णय देताना त्यांना प्रवासाचे वेळापत्रक सादर करण्याची सूचना केली आहे. वाड्रा यांनी लंडनला जाण्याचीही परवानगी मागितली होती. परंतु, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली. 

यावेळी ईडीकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अॅड. नितेश राणा हे न्यायालयात उपस्थितीत होते. वाड्रा यांनी लंडनमध्ये जाण्यासाठी परवानगी  मागितली होती. त्याला ईडीने विरोध केला होता. वाड्रा सध्या मनी लाँडरिंग आरोपाचा सामना करत आहेत. 

... यामुळे प्रियांका गांधींचा मुलगा रेहानने केले नाही मतदान