काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी के शिवकुमार यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा २५ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या मागणीनंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात त्यांच्या अटकेचा कालावधी संपल्यानंतर ईडीने त्यांना न्यायालयासमोर सादर केले होते. त्यांच्या कोठडीचा कालावधी वाढवण्याचा न्यायालयाने निर्णय घेतला. शिवकुमार यांनी त्याचा विरोध केला नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे संकटमोचक समजले जाणारे शिवकुमार यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती.
'अभिनंदन दादा.... देर है अंधेर नहीं। सेहवागचा शुभेच्छा स्ट्रोक
ईडीचे विशेष अधिवक्ता अमित महाजन, नीतेश राणा आणि एन के मट्टा यांनी शिवकुमार यांच्या कोठडीत वाढ मागितली होती. यापूर्वी २५ सप्टेंबरला न्यायालयाने शिवकुमार यांची जामीन याचिक फेटाळली होती. शिवकुमार हे प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यांना जर मुक्त करण्यात आले तर याप्रकरणातील पुरावे आणि साक्षीदारांना प्रभावित केले जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले होते.
शेंबडं पोरंही सांगेल राज्यात महायुतीचंच सरकार येणारः फडणवीस
शिवकुमार यांना ईडीने ३ सप्टेंबर रोजी अटक केली होती. १४ दिवस ईडीच्या कोठडीत राहिल्यानंतर १७ तारखेला त्यांना तिहार कारागृहात पाठवण्यात आले होते.