पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरणः दोषी विनयचा आणखी एक डाव फसला, कोर्टाने याचिका फेटाळली

विनय शर्मा

दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातील एक दोषी विनय शर्माची याचिका फेटाळली आहे. विनयने स्वतःला मनोरुग्ण सांगत वैद्यकीय उपचाराची मागणी केली होती. उल्लेखनीय म्हणजे याप्रकरणी आतापर्यंत तिसऱ्यांदा डेथ वॉरंट जारी करण्यात आलेले आहे. नव्या डेथ वॉरंटनुसार तिघांना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार आहे. परंतु, दोषींचा बचावासाठी अजूनही प्रयत्न सुरुच आहे. कधी दोषी स्वतःला मानसिक रुग्ण सांगतात, तर कधी या घटनेच्या वेळी अल्पवयीन असल्याचे सांगत आहेत, तर कधी राष्ट्रपतींकडून दया याचिका फेटाळण्याच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले. याच क्रमात दोषी विनय शर्मा स्वतःला स्क्रिझोफेनियाचा रुग्ण सांगत न्यायालयात गेला होता. 

स्वरा म्हणते, या सरकारवर भरवसाच नाय!

न्यायालयाने निकाल देताना म्हटले की, फाशीपूर्वी दोषीला भीती आणि नैराश्य येणे स्वाभाविक आहे. या प्रकरणात दोषींना योग्य ते वैद्यकीय उपचार आणि मनोवैज्ञानिक मदत देण्यात आल्याचे पुरावे आहेत. 

मालिकेतील कोणताही भाग वगळला जाणार नाही: अमोल कोल्हे

न्यायालयाच्या निकालानंतर निर्भयाची आई आशादेवी म्हणाल्या की, फाशी टाळण्याचा हा आणखी एक प्रकार होता. दोषी न्यायालयाची दिशाभूल करत आहे. त्यांचे सर्वच कायदेशीर उपाय संपुष्टात आले आहेत. मला आशा आहे की, त्यांना ३ मार्चाला फाशी दिली जाईल.

सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन केली हत्या, आरोपी अटकेत