पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ईडी तिहारमध्ये उद्या चिदंबरम यांची चौकशी करणार, अटकेचीही शक्यता

पी. चिदंबरम

दिल्लीतील एका न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या चौकशीची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर गरज भासल्यास त्यांना अटकही केली जाऊ शकते. दरम्यान, आयएनएक्स मीडिया प्रकरणात कारवाईचा सामना करत असलेले पी चिदंबरम यांच्या अटकेसाठीच्या ईडीच्या अर्जावर दिल्लीतील विशेष न्यायालयाने सोमवारी निर्णय राखीव ठेवला होता. दरम्यान, आजच चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यामध्ये सीबीआयही आपल्याला अपमानित करण्यासाठी कारागृहात ठेवू इच्छिते, असा आरोप केला होता.

चिदंबरम आयएनएक्स मीडियाशी संबंधीत प्रकरणात पाच सप्टेंबरपासून कारागृहात आहेत. चिदंबरम तिहारच्या सात नंबरच्या कारागृहात आहेत. हे कारागृह आर्थिक गुन्हेगारांसाठी आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेला झटका; ३६ नगरसेवक, ३५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

सीबीआयकडून माजी अर्थमंत्र्यांना २१ ऑगस्टला अटक केल्यानंतर दिल्लीतील एका न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. त्यांच्यावर अर्थमंत्री असताना आयएनएक्स मीडियाला (आता ९ एक्स न्यूज)  ३०५ कोटींच्या एफआयपीबीला मंजुरी देण्यात अनियमितता करण्याचा आरोप आहे.

प्रचारातील धावपळीमुळे धीरज देशमुख आजारी, रुग्णालयात दाखल