पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली मतदानाची टक्केवारी अजून जाहीर नाही, आपचा निवडणूक आयोगाला सवाल

अरविंद केजरीवाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आम आदमी पक्षाने (आप) निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केला आहे. आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी रविवारी निवडणूक आयोगावर टीका केली. दिल्लीत किती टक्के मतदान झाले, हे निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे का, असा सवाल त्यांनी विचारला आहे. दिल्लीत किती टक्के मतदान झाले आहे याची आकडेवारीच निवडणूक आयोगाने अजून दिलेली नाही, माझ्या मते भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होत आहे अशी प्रतिक्रिया संजय सिंह यांनी दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळीही निवडणूक आयोगाने त्याच दिवशी मतदानाची टक्केवारी जाहीर केली होती, असेही ते म्हणाले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही खूप आश्चर्यकारक गोष्ट असल्याचे म्हटले आहे. मनीष सिसोदिया यांनी तर मतदानाची अंतिम आकडेवारी भाजप कार्यालयातून मिळणार की निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे. 

संजय सिंह पुढे म्हणाले की, जेव्हा मतपत्रिकेद्वारे मतदान होत असत. तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी वृत्तपत्रात किती टक्के मतदान झाले हे समजत असत. यावेळी अजूनही संपूर्ण माध्यमे आणि दिल्लीवासीयांना किती टक्के मतदान झाले हे माहीत नाही. गेल्या ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी सांगण्यास तयार नाही. याचाच अर्थ कुठेतरी काहीतरी शिजत आहे. काहीतरी काळेबेरे आहे. कोणता तरी खेळ सुरु आहे. कारण मतांची टक्केवारी सांगणे ही अत्यंत सामान्य बाब आहे. 

आपण केवळ दंगल झाल्यानंतरच हिंदू असतोः राज ठाकरे

अरविंद केजरीवाल यांनीही याबाबत टि्वट केले आहे. ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे. निवडणूक आयोग काय करत आहे? मतदानाच्या अनेक तासांनंतरही त्यांनी मतदानाची आकडेवारी का प्रसिद्ध केले नाहीत?, असा सवाल त्यांनी विचारला. 

... तर यापुढं तलवारीला तलवारीने उत्तर देऊ, राज ठाकरेंचा इशारा

दरम्यान, सर्व एक्झिट पोल्समध्ये दिल्लीत आम आदमी पक्षाचीच सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपच्या जागा वाढताना दिसत आहे. तर काँग्रेसला यंदा खाते उघडण्याची संधीही मिळण्याची शक्यता नाही.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Delhi CM Arvind Kejriwal Tweet Absolutely shocking What is EC doing Why are they not releasing poll turnout figures several hours after polling